महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॅडमिंटन : न्यूझीलंड ओपनच्या पहिल्याच फेरीत सायना नेहवाल गारद - New Zealand Open

पराभवासह सायना नेहवालचे न्यूझीलंड ओपनमधील आव्हानही संपुष्टात

सायना नेहवाल

By

Published : May 1, 2019, 5:31 PM IST

Updated : May 1, 2019, 7:27 PM IST

ऑकलंड (न्यूझीलंड) -बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला न्यूझीलंड ओपन बॅडमिंटनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसलाय. या पराभवासह सायनाचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.


न्यूझीलंड ओपनच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत 212 व्या स्थानी असलेल्या चीनच्या वांग झेईने सायनाला 21-16, 21-23, 21-4 असा पराभवाचा धक्का देत स्पर्धेत मोठा उलटफेर केला. झेई आणि सायना या दोघी प्रथमच बॅडमिंटन कोर्टवर आमनेसामने आले होते.


सायनाव्यतिरीक्त महिला ऐकेरीत दुसरी भारतीय खेळाडू अनुरा प्रभुदेसाईलाही पराभवाचा सामना करावा लागला. तीला चीनच्याच ली जुरेईने अवघ्या 20 मिनिटांत 21-9 21-10 असे पाराभूत केले.

Last Updated : May 1, 2019, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details