बार्सिलोना -भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, समीर वर्मा आणि अजय जयराम यांनी बार्सिलोना स्पेन मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित सायनाने गुरुवारी महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या मारिया उलितिनाचा २१-१०, २१-१९ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा सामना आता तिसऱ्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानशी होईल.
बार्सिलोना स्पेन मास्टर्स : सायना नेहवाल, समीर वर्मा आणि अजय जयराम उपांत्यपूर्व फेरीत - सायना नेहवाल बार्सिलोना स्पेन मास्टर्स न्यूज
पाचव्या मानांकित सायनाने युक्रेनच्या मारिया उलितिनाचा, पुरुष एकेरीत समीरने जर्मनीच्या काई शेफरचा आणि जयरामने किदांबी श्रीकांतचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बार्सिलोना स्पेन मास्टर्स : सायना नेहवाल, समीर वर्मा आणि अजय जयराम उपांत्यपूर्व फेरीत
हेही वाचा -भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा क्रिकेटमधून निवृत्त
पुरुष एकेरीत समीरने अंतिम-१६ च्या सामन्यात जर्मनीच्या काई शेफरचा २१-१४, १६-२१, २१-१५ असा पराभव करून अंतिम-८ मध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर जयरामने उपउपांत्यपूर्व फेरीत तृतीय मानांकित किदांबी श्रीकांतचा २१-६, २१-१७ असा पराभव करून अंति -८ मध्ये प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत जयरामचा सामना फ्रान्सच्या थॉमस रोक्सेलशी होईल.