मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आता लवकरच बायोपिक येणार आहे. या चित्रपटामध्ये सायनाच्या भूमिकेत अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून तत्पूर्वी सायनाने परिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.
सायनाने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन परिणीतीच्या लुकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत सायनाने परिणीती आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला ११ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.
दरम्यान, या बायोपिकचे दिग्दर्शन अमोल गुप्त करणार आहेत. तर भूषण कुमार निर्देशनाची जबाबदारी पार पाडत आहेत. या चित्रपटासाठी परिणीती मागील सहा महिन्यांपासून बॅडमिंटनचा सराव करत आहे. परिणीतीने या चित्रपटाविषयी उत्सुक असल्याचे सांगितले आहे. हा चित्रपट २०२० मध्ये पार पडणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेपूर्वी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.