मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटपटू सायना नेहवाल आणि पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणय या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे ते आजपासून सुरू होत असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानी असलेली सायना, थायलंड ओपन स्पर्धा खेळण्यासाठी बँकॉकमध्ये होती. तिची स्पर्धेआधी तिसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. सायनाने चाचणीदरम्यानचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. चाचणीत तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
एचएस प्रणय देखील थायलंड ओपन खेळण्यासाठी बँकॉकमध्ये होता. त्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्टमधून स्पष्ट झाले. यानंतर दोघांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. तसेच दोघांना थायलंड ओपन स्पर्धेतून माघार घेण्यासही सांगण्यात आले आहे.