All England Championships : सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव; आव्हानही संपुष्टात - All England Championships 2019
सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा धक्का
बर्मिंगहॅम - भारताची फुलराणी सायना नेहवालला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे सायनाचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तैवानच्या ताय झू यिंगने सायनाचा २१-१५, २१-१९ असा पराभव केला. ३८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सायनाचा पराभव करत ताय झू यिंगने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसल्याने यापूर्वीच ती स्पर्धेबाहेर पडली होती. त्यानंतर भारताची सर्व मदार ही सायनावर होती मात्र, तीचाही उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाल्याने भारताच्या विजेतेपदाच्या आशेवर पाणी पडले आहे.