महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताच्या दोन दिग्गज महिला बॅडमिंटनपटूंचे वादळ उपांत्यपूर्व फेरीत घोंघावणार - saina nehwal latest news

सिंधू कारकिर्दीत पहिल्यांदाच मिन विरुद्ध कोर्टात उभी ठाकली होती. जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानी असलेल्या सिंधुने मिनवर सहज विजय मिळवला.

भारताच्या दोन दिग्गज महिला बॅडमिंटनपटूंचे वादळ उपांत्यपूर्व फेरीत घोंघावणार

By

Published : Oct 25, 2019, 1:12 PM IST

पॅरिस -भारताच्या दोन दिग्गज महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधु यांनी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत दमदार प्रवेश केला. सिंधुने महिला एकेरीत सिंगापूरच्या येओ जिया मिनला २१-१०, २१-१३ असे पछाडत उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधु आणि मिन यांच्यातील हा सामना ३४ मिनिटे रंगला होता.

हेही वाचा -भारत वि. बांगलादेश मालिका : चार वर्षांपूर्वी टी-२० खेळलेल्या 'या' खेळाडूचे संघात पुनरागमन

सिंधू कारकिर्दीत पहिल्यांदा मिन विरुद्ध कोर्टात उभी ठाकली होती. जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानी असलेल्या सिंधुने मिनवर सहज विजय मिळवला. दुसरीकडे, भारताची फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठव्या मानांकित सायना नेहवालने तिच्या दुसर्‍या सामन्यात डेन्मार्कच्या लाइन हॉजमार्क कैसरफेल्डला २१-११, २१-११ असे सरळ गेममध्ये पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या सायनाचा कैसरफेल्ड विरुद्ध चार सामन्यात सलग चौथा विजय आहे. उपांत्यपूर्व फेरीत सायनाचा सामना एन से युंगशी होईल.

पुरुष दुहेरीमध्ये सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी द्वितीय मानांकित इंडोनेशियाच्या मोहम्मद एहसान व हेंद्र सेतीवानचा २१-१८, १८-२१, २१-१३ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना डेन्मार्कच्या किम अ‍ॅस्ट्रूप आणि अँडर्स रॅमुसेन यांच्याशी होणार आहे

ABOUT THE AUTHOR

...view details