महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बार्सिलोना स्पेन मास्टर्स : भारताची 'फुलराणी' दुसऱ्या फेरीत - सायना नेहवाल बार्सिलोना स्पेन मास्टर्स न्यूज

पाचव्या मानांकित सायनाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या युवोने लेईला नमवले. तर, पुरुष एकेरीत प्रणॉयला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

Saina Nehwal advances to 2nd round of Barcelona Masters
बार्सिलोना स्पेन मास्टर्स : भारताची 'फुलराणी' दुसऱ्या फेरीत

By

Published : Feb 19, 2020, 9:23 PM IST

बार्सिलोना - भारतीय महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बार्सिलोना स्पेन मास्टर्समध्ये विजयी सुरुवात केली आहे. पाचव्या मानांकित सायनाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या युवोने लेईला २१-१६, २१-१४ असे नमवले. तर, पुरुषांमध्ये एच.एस. प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप यांना पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

हेही वाचा -चेतेश्वर पुजारा इंग्लंडसाठी खेळणार!

पुरुष एकेरीत प्रणॉयला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. मलेशियाच्या डॅरेन ल्यूने प्रणॉयचा २१-१८, २१-१५ असा पराभव केला. दुसर्‍या फेरीत डॅरेनचा सामना फ्रान्सच्या लुकास कोर्वीशी होईल. तर, कश्यपला ब्राझीलच्या यागोल कोएल्होविरुद्धचा सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे कोएल्होला पुढच्या फेरीत जाण्याची संधी मिळाली.

दरम्यान, मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी यांच्या जोडीने मथियास ख्रिश्चन आणि अलेक्झांड्रा बोजे यांचा १०-२१, २१-१६, २१-१७ असा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. पुढच्या फेरीत त्यांचा सामना अव्वल मानांकित मलेशियाच्या गोह सून हूट आणि लाई शेव्हन जेमीशी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details