बँकॉक - कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीत सध्या सुरू असलेल्या थायलंड ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. वर्ल्ड बॅडमिंटन असोसिएशनने (बीडब्ल्यूएफ) साई प्रणीतबाबत माहिती दिली. सध्या तो १० दिवस रुग्णालयात राहील.
हेही वाचा - धोनीच्या संघातून बाहेर पडला वर्ल्डकप विजेता खेळाडू
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात साई प्रणीत मलेशियाच्या डॅरेन लिऊशी भिडणार होता. तत्पूर्वी, भारताच्या किदाम्बी श्रीकांतला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. थायलंडच्या सिटीकोने अवघ्या ३७ मिनिटांत श्रीकांतला २१-११, २१-११ असे स्पर्धेबाहेर ढकलले. साई प्रणीत आणि श्रीकांत एकाच हॉटेलमध्ये राहायला होते. त्यामुळे श्रीकांतलाही कठोर क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले.
सोमवारी झालेल्या कोरोना चाचणीत श्रीकांत निगेटिव्ह आढळला होता. शिवाय, थायलंला पोहोचल्यानंतरही त्याची चाचणी निगेटिव्ह आली होती.