नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू बी. साई प्रणीतने चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केल्यामुळे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्याला इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकाने पराभूत केले. या पराभवाबरोबरच भारताचेही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : सुशील कुमार पहिल्याच फेरीत गारद
५५ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात प्रणीतला अँथनीकडून २१-१६, ६-२१, १६-२१ अशी हार पत्करावी लागली. पहिल्या सेटमध्ये प्रणीतने दमदार सुरुवात करत हा सेट २१-९ ने जिंकला होता. त्यानंतर मात्र, जागतिक क्रमवारीत ९ व्या स्थानी असलेल्या अँथनीने पुढच्या दोन सेटमध्ये दमदार कामगिरी केली.