महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

न्यूझीलंड ओपन: बी. साई प्रणितचा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता लिन डॅनकडून पराभव - New Zealand Open

बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत लिन डॅन 12व्या तर बी. साई प्रणीतला 20व्या क्रमांकावर

बी. साई प्रणीत

By

Published : May 2, 2019, 5:31 PM IST

ऑकलंड (न्यूझीलंड) - भारतीय बॅडमिंटनपटू बी. साई प्रणित न्यूझीलंड ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. चीनचा दोन वेळचा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता दिग्गज खेळाडू लिन डॅनने गुरुवारी प्रणीतला 37 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-12, 21-12 ने पराभुत केले.


बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत लिन डॅन 12व्या तर बी. साई प्रणीतला 20व्या क्रमांकावर आहे. प्रणीत आणि डॅन हे आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले असून, यापूर्वी 2017च्या मलेशिया ओपनमध्ये डॅनने प्रणीतला 18-21 21-19 21-18 असे हरवले होते. तर दुहेरीत मनू आणि सुमित या भारतीय जोडीच्या पराभवानंतर भारताचे दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले आहे.


भारताकडून न्यूझीलंड ओपन स्पर्धेत फक्त एचएस प्रणॉयचे आव्हान बाकी राहीले आहे. प्रणॉयचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गियातोशी होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details