नवी दिल्ली -विश्वविजेती भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यावर्षी 'थॉमस अॅण्ड उबर' चषकात खेळणार आहे. यापूर्वी, तिने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. मात्र ती आता ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत खेळणार आहे.
अखेर 'थॉमस अॅण्ड उबर' स्पर्धेत सिंधू होणार सहभागी - sindhu in thomas and uber cup
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिसवा सरमा यांच्या आदेशानुसार सिंधूने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सिंधूने सांगितले होते.

हिमंता म्हणाले, ''सिंधूने या स्पर्धेत खेळण्याचे मान्य केले आहे. कौटुंबिक कार्यक्रम आधी उरकून घेऊन ती भारतीय संघात सामील होणार आहे.'' सिंधूने सध्या हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीतील राष्ट्रीय बॅडमिंटन शिबिरात भाग घेतला आहे. शिबिरात भारतीय बॅडमिंटनचे २६ खेळाडू सहभागी झाले आहेत.