महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरिया ओपन : भारताला मोठा धक्का, सिंधु पहिल्याच फेरीत गारद

जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बिएवेन झांगने सिंधुला मात दिली. तिने ऑलिम्पिक विजेत्या सिंधुला ७-२१, २४-२२, २१-१५ असे हरवले. नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुने सुवर्णपदक जिंकले होते.

कोरिया ओपन : भारताला मोठा धक्का, सिंधु पहिल्याच फेरीत गारद

By

Published : Sep 25, 2019, 1:53 PM IST

नवी दिल्ली - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुला कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. महिलांच्या एकेरीत सिंधुला पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले.

हेही वाचा -लंकेचे खेळाडू पाकिस्तानात दाखल, मिळाली 'झेड-प्लस' सुरक्षा

जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बिएवेन झांगने सिंधुला मात दिली. तिने ऑलिम्पिक विजेत्या सिंधुला ७-२१, २४-२२, २१-१५ असे हरवले. नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुने सुवर्णपदक जिंकले होते.

पी.व्ही. सिंधु

झांग आणि सिंधु यांच्यातील हा सामना ५६ मिनिटे चालला. आधी झालेल्या चार लढतींपैकी झांगचा हा पहिलाच विजय आहे. सिंधु लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेतून लवकर बाहेर पडली आहे. २४ वर्षीय सिंधुने मागच्या आठवड्यात झालेल्या चीन ओपन सुपर १००० स्पर्धेत पराभव पत्करला होता.

बिएवेन झांग

या सामन्यात सिंधुला थायलंडच्या पोर्नपावे चोचूवोंगने हरवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details