महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नागार्जुनच्या उपस्थितीत चामुंडेश्वरी नाथ यांनी दिली सिंधूला बीएमडब्ल्यू भेट - brand new BMW car with Sindhu

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूने जेतेपद पटकावले. तिच्या या यशाचे देशभरातून कौतुक करण्यात आले. आता चामुंडेश्वरी नाथ यांनी सिंधुला महागडी बीएमडब्ल्यू गिफ्ट देत तिचे कौतुक केले आहे.

नागार्जूच्या हस्ते सिंधूला बीएमडब्ल्यू भेट

By

Published : Sep 14, 2019, 4:13 PM IST

Updated : Sep 14, 2019, 6:23 PM IST

हैदराबाद - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी पी. व्ही. सिंधूला भारताचे माजी क्रिकेटपटू, तेलंगाणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चामुंडेश्वरी नाथ यांनी खास गिफ्ट दिले आहे. नाथ यांनी सिंधूला ब्रॅन्ड न्यू बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली आहे.

हेही वाचा -विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : कुस्तीच्या कुंभमेळ्याला आजपासून प्रारंभ

नुकत्याच पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूने जेतेपद पटकावले. तिच्या या यशाचे देशभरातून कौतुक करण्यात आले. आता चामुंडेश्वरी नाथ यांनी सिंधुला महागडी बीएमडब्ल्यू गिफ्ट देत तिचे कौतुक केले आहे. भेट प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आणि सिंधुचे प्रशिक्षक गोपीचंद यांची प्रमुख उपस्थिती होती.

नागार्जूच्या हस्ते सिंधूला बीएमडब्ल्यू भेट

हेही वाचा -रनमशीन स्मिथने मोडला महाबली इंझमामचा 'तो' रेकॉर्ड

कार्यक्रमामध्ये नागार्जुनने सिंधुच्या आई-वडिलांचे कौतुक केले. याप्रसंगी बोलताना सिंधु म्हणाली, 'नाथ यांनी दिलेली भेट प्रोत्साहन वाढवणारी आहे'. सिंधूने बीडब्ल्यूएफ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ ने पराभव केला होता. दरम्यान, नाथ यांनी यापूर्वी २२ कार खेळाडूंना भेट म्हणून दिल्या आहेत.

Last Updated : Sep 14, 2019, 6:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details