बासेल -भारताच्या पी. व्ही. सिंधुने बासेल येथे सुरु असलेल्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत विजयारंभ केला. तिने जागतिक क्रमवारीत ४५ व्या स्थानी असलेल्या चीनच्या पाई यू पोला पराभूत केले. या विजयाबरोबर सिंधुने पाई यू पोवर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
बॅडमिंटन - भारताच्या सिंधूची बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत धडक - पी. व्ही. सिंधु
सिंधुने जागतिक क्रमवारीत ४५ व्या स्थानी असलेल्या चीनच्या पाई यू पोला पराभूत केले. या विजयाबरोबर सिंधुने पाई यू पोवर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.
सिंधुने चीनच्या या खेळाडूला २१-१४, २१-१५ अशा गेममध्ये हरवले. ४३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधुने दमदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी संघर्ष केला. मात्र, सिंधुने सुरुवातीला ११-७ ने आघाडी घेतली. त्यानंतर तिने ही आघाडी १४-९ ने वाढवली.
दुसऱ्या गेममध्ये सिंधु ७-४ ने आघाडीवर होती. त्यानंतर मात्र, पाई यू पोने सामन्यात पकड घ्यायला सुरुवात केली. तिने गुणफलक ९-१० असा केला. मात्र, सिंधुने आपला सर्व अनुभव पणाला लावत ही आघाडी १९-१४ ने वाढवली आणि हा सामना २१-१५ ने जिंकला. पहिल्या फेरीत सिंधुला बाय मिळाला होता.