गुवाहाटी- भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ८३ व्या राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने उपांत्यपूर्व सामन्यात रिया मुखर्जीला २१-१६, २१-१२ असे नमवले.
पी. व्ही. सिंधूची ८३ व्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक - राष्ट्रीय
सिंधूने उपांत्यपूर्व सामन्यात रिया मुखर्जीला २१-१६, २१-१२ असे नमवले. सिंधूने याआधी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करताना २०११ आणि २०१३ साली विजेतेपद पटकावले होते.
पीव्ही सिंधू
सिंधूने स्पर्धेची सुरुवात चांगली करताना नागपूरच्या मालविका बनसोडवर २१-११, २१-१३ असा विजय मिळवला होता. सिंधूने याआधी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करताना २०११ आणि २०१३ साली विजेतेपद पटकावले होते.
स्पर्धेत भारताची फुलराणी सायना नेहवालनेही चांगली कामगिरी करताना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने श्रुती मंदानाला २१-११, २१-१० असे पराभूत केले. उपांत्यपूर्व तिचा सामना नेहा पंडितसोबत होणार आहे.