महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

थायलंड ओपन २०२१ : सिंधूची विजयी सलामी - थायलंड ओपन २०२१ न्यूज

भारताची अव्वल टॉप सीडेड तसेच विश्वविजेती महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने आज टोयोटा थायलंड ओपन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली.

pv sindhu eases into second round of thailand open
थायलंड ओपन : सिंधूची विजयी सलामी

By

Published : Jan 19, 2021, 12:37 PM IST

बँकॉक - भारताची अव्वल टॉप सीडेड तसेच विश्वविजेती महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने आज टोयोटा थायलंड ओपन स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. तिने पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओनगबामुरानफान हिचा पराभव केला.

कोविड काळानंतर सिंधू प्रथमच स्पर्धेत सहभागी झाली आहे. तिने थायलंड ओपन स्पर्धेत बुसानन हिचा पराभव केला. ४३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने बुसानन हिचा २१-१७, २१-१३ अशा धुव्वा उडवला.

पहिल्या गेममध्ये बुसानन हिने १३-८ अशी बढत घेतली होती. यानंतर सिंधूने दमदार वापसी करत हा गेम २१-१७ असा जिंकला. हाच धडाका तिने, दुसऱ्या गेममध्ये देखील कायम राखत दुसरा गेम २१-१३ असा जिंकत दुसरी फेरी गाठली.

दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना दोहाची हॅनी आणि कसोना सेलावडुरे यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

हेही वाचा -'टाइम' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली भारताची मानसी जोशी

हेही वाचा -कोरोनातून सावरला जगातील पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू

ABOUT THE AUTHOR

...view details