महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सिंधू ‘आय एम बॅडमिंटन’ अभियानाची ब्रँड अ‌ॅम्बेसेडर - pv sindhu I Am Badminton ambassador news

या मोहिमेमध्ये, खेळाडूंना बॅडमिंटन खेळाबद्दल आवड आणि आदर व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जाते. यात ते प्रामाणिकपणाने खेळण्याचा सल्ला देतात.

pv sindhu as the ambassador for the I Am Badminton awareness campaign
सिंधू ‘आय एम बॅडमिंटन’ अभियानाची ब्रँड अ‌ॅम्बेसेडर

By

Published : Apr 24, 2020, 6:40 PM IST

मुंबई - जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या (बीडब्ल्यूएफ) ‘आय एम बॅडमिंटन’ जागरूकता अभियानासाठी विश्वविजेत्या पीव्ही सिंधूसह आठ खेळाडूंची ब्रँड अ‌ॅम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. सिंधूखेरीज कॅनडाची मिशेल ली, चीनची झेंग सी वेई आणि हुआंग या केओंग, इंग्लंडची जॅक शेपर्ड, जर्मनीची वॉलेस्का नोब्लाच, हाँगकाँगची चान हो यूएन आणि जर्मनीची मार्क ज्वेलबर यांचा या अभियानात समावेश आहे.

या मोहिमेमध्ये, खेळाडूंना बॅडमिंटन खेळाबद्दल आवड आणि आदर व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ दिले जाते. यात ते प्रामाणिकपणाने खेळण्याचा सल्ला देतात.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती २४ वर्षीय सिंधू म्हणाली, की कोणत्याही खेळात प्रामाणिक असणे खूप महत्त्वाचे आहे. जर हे सर्व खेळाडू हे समजावून सांगू शकतील, तर मला वाटते की हा संदेश अधिक खेळाडूंकडे पोहोचेल.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details