बासेल -भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु आणि साईप्रणीत यांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या दोन्ही खेळाडूंनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोघांव्यतिरिक्त सायना नेहवाल आणि किदांबी श्रीकांत हे खेळाडू स्पर्धेबाहेर पडले आहेत.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधुने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवन झांग हिला २१-१४, २१-६ असे सहज हरवले. सिंधुने हा सामना ३४ मिनिटांत जिंकला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधुचा सामना चीनच्या ताय झू यिंगसोबत होणार आहे. तिच्यासोबतचा सिंधुचा विजयाचा आलेख १०-४ असा आहे.