नवी दिल्ली - भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉयने स्टार स्पोर्ट्सला एक विनंती केली आहे. लॉकडाउन दिवसांत क्रिकेटच्या व्यतिरिक्त इतर खेळही दाखवण्यात यावेत, असे प्रणॉयने या विनंतीत म्हटले आहे.
“क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ दाखवा”, स्टार बॅडमिंटनपटूने केली विनंती - star sports and hs prannoy news
प्रणॉयने ट्विटरद्वारे ही विनंती केली. या ट्विटमध्ये त्याने स्टार स्पोर्ट्सला टॅग केले आहे. स्टार स्पोर्ट्स तुम्हाला माझी एक छोटी विनंती आहे की लॉकडाउन दरम्यान आपल्या चॅनेलवर २४ तास क्रिकेट दाखवले जाते. बाकीचे खेळ दाखवल्यास तुमच्या बाजूने मोठी मदत होईल, असे प्रणॉयने ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रणॉयच्या ट्विटला स्टार स्पोर्ट्सनेही उत्तर दिले आहे. आम्ही तुमचे म्हणणे ऐकले. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की विम्बल्डन, फ्रेंच ओपन, एफ -1 यासह इतर अनेक खेळांचे वेळापत्रक तयार आहे, असे स्टार स्पोर्ट्सने ट्विटमध्ये म्हटले. या ट्विटवर प्रणॉयने “कृपया बॅडमिंटनचाही समावेश करा”,असे लिहिले आहे.