चीन -सध्या सुरू असलेल्या चीन ओपनमध्ये भारताच्या पारूपल्ली कश्यपने विजयी पताका फडकावत, दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत कश्यपने थायलंडच्या सिथिकोम थमासिनला २१-१४, २१-३ असे पछाडले.
हेही वाचा -बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच रोहित करणार मोठा विक्रम
थमासिन आणि कश्यप यांच्यातील हा तिसरा सामना होता. यामध्ये कश्यपने प्रथमच विजय मिळवला आहे. पुढील फेरीत त्याचा सामना सातव्या मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसेनशी होईल.
जगज्जेती पी. व्ही. सिंधू पाठोपाठ भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचेही चीन ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सलामीच्या सामन्यात चीनची खेळाडू यान यान काई हिने सायनाचा पराभव केला. तर दुसरीकडे पुरुष गटात भारताचे पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणित यांनी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.