सिंगापूर - ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ४० मिनीटे चाललेल्या सामन्यात सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिफेल्डटचा २१-१३, २१-१९ असा पराभव करत पुढील फेरी गाठली. तर भारताची दुसरी स्टार खेळाडू सायनाने पोर्नपावी चोचुवोंगवर मात करत क्वार्टर फायनलमध्ये पोहचली आहे.
सिंगापूर ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांची क्वार्टर फायनलमध्ये धडक - singapore open 2019
क्वार्टर फायनलमध्ये सिंधचा सामना हा चीनच्या काई यानयानशी होणार आहे.
![सिंगापूर ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांची क्वार्टर फायनलमध्ये धडक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2970412-thumbnail-3x2-bad.jpg)
पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल
या वर्षाच्या सुरुवातीला स्पेन मास्टर्सचा खिताब जिंकणारी ब्लिफेल्डट आणि सिंधू यांचा हा आतापर्यंतचा दुसरा सामना होता. या दोन्ही सामन्याच सिंधूला विजय मिळवण्यात यश आले आहे. क्वार्टर फायनलमध्ये सिंधूचा सामना हा चीनच्या काई यानयानशी होणार आहे.