सिंगापूर - भारताच्या स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी बुधवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. ४३ मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सायनाने इंडोनेशियाच्या युलिया सिसांतोचा २१-१६, २१-११असा पराभव केला. दुसरीकेड पी. व्ही. सिंधूनेही इंडोनेशियाच्याच लायनी अलेसांद्रा मैनाकीला पहिल्या फेरीत २१-९, २१-७ ने नमवत पुढची फेरी गाठली.
सिंगापूर ओपन बॅडमिंटन : सायना आणि सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश - 2nd Round
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून विजेतेपदाच्या आशा
सायना आणि सिंधू
या दोन्ही महिला खेळाडूंसोबत पुरुष एकेरीत समीर वर्मानेही स्पर्धेची विजयी सुरुवात करत दुसरी फेरी गाठलीय. या स्पर्धेत या तीन्ही खेळाडूंकडून भारताला विजेतेपदाच्या आशा असणार आहेत. यापूर्वी क्वालालंपूर येथे झालेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एकाही बॅडमिंटन खेळाडू विजेतेपद मिळवता आले नव्हते.