महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरिया ओपन : पारुपल्ली कश्यपची उपांत्यफेरीत धडक - parupalli kashyap latest news

याआधी, कश्यप आणि जोर्गेन्शन सहा वेळा आमने सामने आले होते. त्यापैकी कश्यपला फक्त दोन वेळा विजय मिळवता आला होता. यावेळी मात्र, कश्यपने त्याला फक्त ३७ मिनिटांतच पराभूत केले. उपांत्य फेरीत कश्यपचा सामना जागतिक क्रमवारीत प्रथम असणाऱ्या जपानच्या कोंटो मोमोटाशी रंगणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मोमोटाने सुवर्णपदक पटकावले होते.

कोरिया ओपन : पारुपल्ली कश्यपची उपांत्यफेरीत धडक

By

Published : Sep 27, 2019, 6:46 PM IST

नवी दिल्ली -भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने आपला विजयी दबदबा कायम राखला आहे. कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कश्यपने धडक दिली. उपांत्यपूर्व फेरीत त्याने डेन्मार्कच्या जान ओ जोर्गेन्शनला २४-२२, २१-८ असे हरवले.

हेही वाचा -मराठमोळ्या राहुल आवारेची विक्रमी कामगिरी; जागतिक क्रमवारीत पटकावले दुसरे स्थान

याआधी, कश्यप आणि जोर्गेन्शन सहा वेळा आमने सामने आले होते. त्यापैकी कश्यपला फक्त दोन वेळा विजय मिळवता आला होता. यावेळी मात्र, कश्यपने त्याला फक्त ३७ मिनिटांतच पराभूत केले. उपांत्य फेरीत कश्यपचा सामना जागतिक क्रमवारीत प्रथम असणाऱ्या जपानच्या कोंटो मोमोटाशी रंगणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मोमोटाने सुवर्णपदक पटकावले होते.

या स्पर्धेतील पुरुष एकेरीमध्ये कश्यप हा भारताचा एकमात्र खेळाडू राहिला आहे. महिला वर्गात सिंधु आणि सायना नेहवाल आधीच स्पर्धेबाहेर पडले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details