मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने अमेरिकन खेळाडू जेनिफर ब्रॅडीचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन 2021 चा किताब जिंकला. ऑस्ट्रेलियन ओपन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ओसाकाने दोन सेटमध्ये ब्रॅडीचा 6-4, 6-3 असा पराभव केला. आठव्यांदा ग्रँडस्लॅममध्ये खेळताना तिने चारवेळा विजेते पद मिळवले आहे.
ओसाकाने आपल्या कारकिर्दीतील चौथे ग्रँड स्लॅम जिंकले आहे. ओसाकाने गेल्या वर्षी अमेरिकन ओपनचे जेतेपद जिंकले होते. 2018 मध्ये तिने यूएस ओपन आणि 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनची ट्रॉफी जिंकली. 23 वर्षीय ओसाकाचा जन्म जपानमध्ये झाला होता, परंतु ती तीन वर्षांची असताना कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाली.