नवी दिल्ली -विश्वविजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) या स्पर्धेत सिंधूला प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूने २०१८ बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद जिंकले होते.
बीडब्ल्यूएफच्या नियमांनुसार, यापूर्वी सिंधूला बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्समध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. पण कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे बीडब्ल्यूएफने यंदा हा नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे.