नवी दिल्ली -कोरोनामुळे इंडिया ओपन सुपर ५०० स्पर्धा विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारतीय बॅडमिंटन संघाने हा निर्णय घेतला आहे.
इंडिया ओपन सुपर ५०० स्पर्धेचे आयोजन ११ ते १६ मे या दरम्यान करण्यात आले आहे. ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरिन आणि जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला जपानचा पुरूष खेळाडू केंटो मोमोटा देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. चार लाख डॉलरचे बक्षिस असलेली ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी अखेरची स्पर्धा आहे. यात चीनसह ३३ देशाचे २२८ खेळाडू सहभागी होणार आहेत.
भारतीय बॅडमिंटन संघाने सांगितलं की, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ही स्पर्धा विनाप्रेक्षक खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत खेळाडूंना बायो बबलमध्ये सुरक्षित ठेवले जाणार आहे.