क्वालालंपूर - चीनचा अनुभवी बॅडमिंटन खेळाडू लिन डॅनने मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचा किताब पटकावला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन डॅनने 78 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात चेन लोंगला 9-21, 21-7, 21-11 ने पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरले.
लिन डॅनने जिंकला मलेशिया ओपनचा किताब - title
महिला एकेरीत तैवानची ताय झू यिंगची बाजी
लिन डॅन
महिला एकेरीत तैवानच्या अव्वल मानांकित ताय झू यिंगने जपानच्या अकाने यामागुचीला 21-16, 21-19 अशी मात देत विजेतेपद मिळवले. पुरुष दुहेरीत ली जुनहोई आणि ली युचेनने जपानच्या ताकेशी कामुरा आणि किगो सोनोडा 21-12, 21-17 असा पराभव करुन किताब जिंकला.