नवी दिल्ली - भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकत्याच पार पडलेल्या बेल्जियम ओपन स्पर्धेत इतिहास घडवला. लक्ष्यने डेन्मार्कच्या व्हिक्टर स्वेंडसेनला हरवत बेल्जियम ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा -बॅडमिंटन : भारताच्या सौरभची व्हिएतनाम ओपनच्या अंतिम फेरीत धडक
दुसऱया मानांकित स्वेंडसेनला लक्ष्यने २१-१४, २१-१५ असे पराभूत केले. १८ वर्षाच्या लक्ष्यने अवघ्या अर्ध्या तासाच्या खेळात हे विजेतेपद आपल्या नावावर केले. उपांत्य फेरीत किम ब्रुनविरुद्ध लक्ष्यचा सामना अतिशय रंजकपणे पार पडला. त्याने डेन्मार्कच्या ब्रूनचा २१-१८, २१-११ असा पराभव केला.