ओडेंस (डेन्मार्क) -भारताचा स्टार युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन डेन्मार्क ओपन सुपर ७५०च्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कोरोना विषाणूमुळे सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर लक्ष्यने कोर्टवर पुनरागमन केले होते. लक्ष्यला स्थानिक स्पर्धक ख्रिस्टियन सोलबर्ग विटिंग्ज विरुद्ध २१-१५, ७-२१, १७-२१ अशी मात पत्करावी लागली.
यापूर्वी, लक्ष्यने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या क्रिस्टो पोपोव्हचा २१-९, २१-१५ असा सरळ पराभव करत दुसरी फेरी गाठली होती. जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानी असलेल्या सेनने ३६ मिनिटांत हा सामना जिंकला होता.