महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरिया ओपन : सिंधू पाठोपाठ सायनाचेही आव्हान संपुष्टात - सायना नेहवाल लेटेस्ट बातम्या

महिला गटातील पहिल्या फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना दक्षिण कोरियाच्याच किम गा इयून हिच्याशी झाला. या सामन्यात तिसऱ्या गेमनंतर सायनाला दुखापत झाली. यामुळे तिला या सामन्यातून रिटायर व्हावे लागले. तत्पूर्वी ४७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात किम १९-२१, २१-१८, ८-१ ने पुढे होती. दरम्यान, सायनाला या वर्षातील ४ स्पर्धांमध्ये पहिली फेरी पार करता आलेली नाही.

कोरिया ओपन : सिंधू पाठोपाठ सायनाही पहिल्या फेरीत पराभूत

By

Published : Sep 25, 2019, 4:37 PM IST

इन्चॉन (दक्षिण कोरिया )- पी. व्ही. सिंधू पाठोपाठ भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालही कोरिया ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली आहे. दुखापतीमुळे सायनाने सामना अर्ध्यांतून सोडण्याचा निर्णय घेतला, यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयी घोषीत करण्यात आले.

हेही वाचा -उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

महिला गटातील पहिल्या फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना दक्षिण कोरियाच्याच किम गा इयून हिच्याशी झाला. या सामन्यात तिसऱ्या गेमनंतर सायनाला दुखापत झाली. यामुळे तिला या सामन्यातून रिटायर व्हावे लागले.

तत्पूर्वी ४७ मिनिटे चाललेल्या या सामन्यात किम १९-२१, २१-१८, ८-१ ने पुढे होती. दरम्यान, सायनाला या वर्षातील ४ स्पर्धांमध्ये पहिली फेरी पार करता आलेली नाही.

सायना नेहवाल

हेही वाचा -कोरिया ओपन : भारताला मोठा धक्का, सिंधु पहिल्याच फेरीत गारद

कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेत भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूलाही पहिल्याच फेरीत गारद व्हावे लागले आहे. जागतिक क्रमवारीत ११ व्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बिएवेन झांगने सिंधूला मात दिली. तिने ऑलिम्पिक विजेत्या सिंधूला ७-२१, २४-२२, २१-१५ असे हरवले. नुकत्याच झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुने सुवर्णपदक जिंकले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details