इन्चॉन (दक्षिण कोरिया )- भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने कोरिया ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. कश्यपने गुरुवारी झालेल्या सामन्यात मलेशियाचा खेळाडू डेरेन लियू याचा पराभव केला.
कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेत ५६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात कश्यपने डेरेनचा २१-१७, ११-२१, २१-१२ ने पराभव केला. डेरेनने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चीनचा दिग्गज खेळाडू लिन डॅनचा पराभव केला होता. यामुळे कश्यप विरुध्दच्या सामन्यात त्याचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कश्यपने डेरेनला धुळ चारत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
हेही वाचा -उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी