All England Championships: श्रीकांतला पराभवाचा धक्का, आव्हान संपुष्टात - 2019
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोमोटाने श्रीकांतचा २१-१२, २१-१६ असा केला पराभव
बर्मिंगहॅम - ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पराभव झाल्याने भारताचा स्टार बॅडमिंटन खेळाडू श्रीकांत किदांबीचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत जागितिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोटाकडून श्रीकांतला पराभवाचा धक्का बसला.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोमोटाने श्रीकांतचा २१-१२, २१-१६ असा पराभव केला. ४४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात श्रीकांतचा पराभव करत मोमोटाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात पी. व्ही. सिंधूला पराभवाचा धक्का बसल्याने यापूर्वीच ती स्पर्धेबाहेर पडली होती. त्यानंतर सायना आणि श्रीकांतचा पराभव झाल्याने तब्बल १८ वर्षांनी या स्पर्धेचे जेतेपद मिळवण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे.