महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

BWF Ranking: श्रीकांत  ठरला टॉप-10 मध्ये जागा बनवणारा एकमेव भारतीय खेळाडू - BWF

बॅडमिंटन महासंघाच्या पुरुष क्रमवारीत किदांबी श्रीकांत आठव्या स्थानी

किदांबी श्रीकांत

By

Published : Mar 6, 2019, 12:28 PM IST

क्वालालंपूर - नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या पुरुष क्रमवारीत किदांबी श्रीकांत आठव्या स्थानी कायम आहे. क्रमवारीत श्रीकांत हा एकमेव भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे, ज्याने टॉप-10 मध्ये जागा बनवली आहे.

श्रीकांतच्या खात्यात 60 हजार 470 गुण आहेत. जपानचा केंटो मोमोटा 1 लाख 4 हजार 750 गुणांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. या क्रमवारीत समीर वर्मा 14व्या तर एच. एस. प्रणॉय 19व्या स्थानी आहे.

जागतिक महिला क्रमवारीत पी.व्ही सिंधू सहाव्या तर सायना नेहवाल नवव्या स्थानी. या क्रमवारीत तैवानची ताई जु यिंग अव्वल स्थानी विराजमान असून जपानची नोझोमी ओकूहारा दुसऱ्या क्रमांकावर आहे.आजपासून (बुधवार) बर्मिंगहॅम येथे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत सायना, सिंधू आणि श्रीकांत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा बॅडमिंटन या खेळात खुप प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत कशी कामगिरी करतात, हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details