हाँगकाँग - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत पोहोचला आहे. पहिल्या फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या जपानच्या केंटो मोमोटा यांच्याशी होणार होता. मात्र, मोमोटाने स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे श्रीकांतला 'बाय' मिळाला.
दुसऱ्या फेरीत श्रीकांतचा सामना सौरभ वर्मा आणि फ्रान्सच्या ब्राईस लेवेरडेज यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. दरम्यान, बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मोमोटोने आठवडाभरापूर्वीच चीन ओपन स्पर्धा जिंकली होती.