मुंबई- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या संकटाशी झुंज देत आहे. कोरोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला आहे. तसेच सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरात कुटुंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात भारताची ग्लॅमरस बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला तिचा बॉयफ्रेंड अभिनेता विष्णू विशालची आठवण येत आहे.
ज्वालाने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ज्वालाने आपला बॉयफ्रेंड विष्णूबरोबरचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोवर मला तुझी आठवण येते, असे ज्वालाने लिहिले आहे.
यावर ज्वालाचा बॉयफ्रेंड विष्णूनेही झकास रिप्लाय दिला. सध्या सारं ठीक आहे. पण आता सोशल डिस्टंस गरजेचे आहे. त्यामुळे आपण सगळ्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करूया, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे. यासोबत त्याने मिठी मारण्याचा इमोजीही त्यात वापरला आहे.