चीन -विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटाने चीन बॅडमिंटन ओपनचे जेतेपद पटकावले. मोमोटाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनला २१-१५, १७-२१, २१-१८ असे पराभूत केले.
चीन ओपन : जपानचा केंटो मोमोटा विजेता - केंटो मोमोटा लेटेस्ट न्यूज
मोमोटाचे यंदाचे हे १० वे विजेतेपद आहे. मोमोटाने एक तास आणि २२ मिनिटांत हा सामना जिंकला.
![चीन ओपन : जपानचा केंटो मोमोटा विजेता](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5022410-1023-5022410-1573394500809.jpg)
चीन ओपन : जपानचा केंटो मोमोटा विजेता
हेही वाचा -ट्रक चालकाच्या मुलाची गरुडझेप, करमाळाच्या सुरज शिंदेची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड
मोमोटाचे यंदाचे हे १० वे विजेतेपद आहे. मोमोटाने एक तास आणि २२ मिनिटांत हा सामना जिंकला. यावर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या कोरिया ओपनमध्ये त्याने चेनचा पराभव केला होता. मोमोटाने चेनविरूद्ध आत्तापर्यंत १० सामने जिंकले तर, ३ सामने गमावले आहेत.