ग्वांगझू - जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जपानच्या केंटो मोमोटाने बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावले. मोमोटाने इंडोनेशियाच्या एंथनी सिनिसुस्का गिंटिगचा पराभव केला. दरम्यान, मोमोटाचे हे वर्षभरातील ११ वे विजेतेतेपद आहे. महत्वाचे म्हणजे, जपानच्या या खेळाडूने ऑगस्ट महिन्यात बासेल येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
२५ वर्षीय मोमोटाने १ तास २७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात गिंटिंगचा १७-२१, २१-१७, २१-१४ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत ८ व्या स्थानावर असलेल्या गिंटिंगने २०१९ या वर्षात ५ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्याला एकही स्पर्धा जिंकता आली नाही.
पहिल्या गेममध्ये गिंटिंगने दमदार खेळ केला. त्याने हा गेम १७-२१ असा जिंकला. यामुळे मोमोटावर दडपण आले. तेव्हा मोमोटाने दडपण झुगारून आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली आणि दुसरा गेम २१-१७ असा जिंकत सामना बरोबरीत ठेवला.