नवी दिल्ली -भारताची महिला बॅडमिंटनपटू एन. सिक्की रेड्डी आणि फिजिओथेरपिस्ट किरण सी. यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) गुरुवारी याबाबत माहिती दिली. हैदराबादच्या गोपीचंद अकादमीतील राष्ट्रीय शिबिरात सिक्कीने भाग घेतला होता. सिक्कीच्या चाचणीनंतर, ही अकादमी सॅनिटायझेशनसाठी बंद करण्यात आली आहे.
"सिक्की आणि किरण या दोघांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोघे हैदराबादचे असून ते घरून शिबिरात येत होते. अकादमी सॅनिटायझेशनसाठी बंद केली गेली आहे. सिक्की आणि किरण यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यांची पुन्हा आरटी पीसीआय चाचणी केली जाईल", असे प्राधिकरणाने सांगितले.