बासेल - भारताची विश्वविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने स्वीस ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आज झालेल्या सामन्यात सिंधूने अमेरिकेच्या आर्यिरस वांग हिचा सहज पराभव करत अंतिम-८ मध्ये जागा मिळवली.
ऑलिम्पिक विजेती सिंधूने ३५ मिनिटात वांगचा धुव्वा उडवला. तिने वांगवर २१-१३, २१-१४ अशा फरकाने विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत ७व्या स्थानी असलेल्या सिंधूचा वांगविरोधातील हा पहिलाच सामना होता.