जकार्ता - भारताची महिला स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला विजयीरथ चालूच ठेवला आहे. सिंधूने जकार्ता येथ सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे.
इंडोनेशिया ओपन : जपानच्या ओकुहारावर मात करत सिंधूची उपांत्यफेरीत धडक - indonesia open
महिला एकेरी सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत सिंधूने उपांत्य सामना गाठला.
महिला एकेरीच्या सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत सिंधूने उपांत्य सामना गाठला. सिंधूने हा सामना 21-14, 21-7 असा जिंकला. ही लढत सिंधूने अवघ्या 44 मिनिटांमध्ये जिंकली.
पुरुष एकेरीत श्रीकांतला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. आठव्या सीडेड भारताच्या किदाम्बी श्रीकांतला हाँगकाँगच्या एनजी का लॉन्ग अँगसने 17-21, 19-21 असे सरळ गेममध्ये हरवले. दुसरीकडे पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या मार्कस गिडीऑन आणि केविन सुकामुलजो या जोडीने भारताच्या सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीवर 21-15, 21-14 अशी मात केली.