मुंबई - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने हैदराबाद ओपनचे जेतेपद पटकावले. आज (रविवारी) झालेल्या अंतिम सामन्यात सौरभने सिंगापुरच्या लोह कीन यियूला पछाडले.
तीन गेमपर्यंत गेलेल्या या अंतिम सामन्यात २६ वर्षीय सौरभने प्रतिस्पर्ध्यावर मात केली आहे. सौरभने कीन यियूला २१-१३, १४-२१, २१-१६ असे हरवले.यंदाच्या मे महिन्यात स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय खिताब जिंकणारा सौरभ पहिल्यांदा कीन यियूसमोर मैदानात उतरला होता.