टोकियो -भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव केलेल्या अकाने यामागुचीनेच सिंधूला उपांत्यपूर्व सामन्यात हरवले.
जपान ओपन : सिंधू स्पर्धेबाहेर, यामागुचीने परत हरवले - india badminton star
चौथ्या सीडेड अकाने यामागुचीने सिंधूला २१-१८, २१-१५ असे हरवले.
चौथ्या सीडेड अकाने यामागुचीने सिंधूला २१-१८, २१-१५ असे हरवले. या दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना ५१ मिनिटांपर्यंत रंगला होता. सिंधूला इंडोनेशिया ओपन स्पर्धेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती. मात्र, या सिंधूला या संधीचे सोने करता आले नाही.
स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला होता. जपानची यामागुचीने सिंधूचा २१-१५ , २१-१६ असा पराभव केला होता. या पराभवाने रिओ ऑलम्पिंक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या सिंधूचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले होते.