नवी दिल्ली -कोरोनाचे संकट टळल्यानंतर हैदराबाद बॅडमिंटन ओपन स्पर्धा रंगणार आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) शुक्रवारी ही घोषणा केली. कोरोनामुळे जगातील सर्व बॅडमिंटन स्पर्धा मार्चपासून पुढे ढकलल्या गेल्या आहेत.
कोरोनानंतर 'या' महिन्यात रंगणार हैदराबाद ओपन - Hyderabad open re-event after corona news
कोरोनाव्हायरसमुळे मार्चपासून 10 हून अधिक बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीडब्ल्यूएफच्या नवीन कार्यक्रमानुसार, हैदराबाद ओपन 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
![कोरोनानंतर 'या' महिन्यात रंगणार हैदराबाद ओपन Hyderabad badminton open ready for re-event after covid 19](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7311300-70-7311300-1590201760563.jpg)
कोरोनाव्हायरसमुळे मार्चपासून 10 हून अधिक बॅडमिंटन स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑर्लीयन्स मास्टर्स 2020 (24-29 मार्च), सिंगापूर ओपन (7-12 एप्रिल), बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2020 (21-26 एप्रिल), पॅन अम चॅम्पियनशिप 2020 (23-26एप्रिल), यूएस ओपन 2020 (23-28 जून) यांचा समावेश आहे. ), कॅनडा ओपन 2020 (30 जून ते 5 जुलै), रशियन ओपन (7–12 जुलै), अकिता मास्टर्स 2020 (18-23 ऑगस्ट), व्हिएतनाम ओपन 2020 (25-30 ऑगस्ट) आणि इंडोनेशिया मास्टर्स 2020 (29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर) या स्पर्धांचा समावेश आहे.
बीडब्ल्यूएफच्या नवीन कार्यक्रमानुसार, हैदराबाद ओपन 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या व्यतिरिक्त ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा इंडिया ओपन 8 ते 13 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.