ऑकलंड (न्यूझीलंड) -भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने न्यूझीलंड ओपनच्या दुसऱ्या फेरीत विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. त्याने इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गियातोला 37मिनीटे चाललेल्या सामन्यात 21-14, 21-12 ने पराभूत करत अंतिम ८ मध्ये प्रवेश केलाय.
न्यूझीलंड ओपन: एच. एस. प्रणॉयची क्वार्टर फायनलमध्ये धडक - quater final
इंडोनेशियाच्या टॉमी सुर्गियातोला ३७ मिनीटे चाललेल्या सामन्यात 21-14, 21-12 ने पराभूत करत अंतिम 8 मध्ये प्रवेश केलाय.
प्रणॉयचा क्वार्टर फायनलमध्ये जापानच्या कांटा सुनेयामाशी सामना होणार आहे. भारताकडून न्यूझीलंड ओपन स्पर्धेत फक्त एचएस प्रणॉयचे आव्हान बाकी राहीले आहे. त्यामुळे भारताला या स्पर्धेत प्रणॉयकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
न्यूझीलंड ओपनमध्ये यापूर्वी झालेल्या सामन्यांमध्ये पुरुष ऐकेरीच्या दुसऱ्या फेरीत बी. साई प्रणितचा तर महिला ऐकेरीच्या पहिल्याच फेरीत स्टार खेळाडू सायना नेहवालला पराभवाचा धक्का बसला होता. तसेच मनू आणि सुमित या भारतीय जोडीच्या पराभवानंतर भारताचे दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले होते.