हाँगकाँग -भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधून हाँगकाँग ओपन स्पर्धेत विजयी सुरूवात केली. तिने पहिल्या फेरीत दक्षिण कोरियाची किम गा ईयूनचा पराभव केला. या विजयासह सिंधू आता दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे. तर पुरुष एकेरीत भारताच्या एच.एस. प्रणॉयने चीनच्या खेळाडूचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.
३६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूने किमचा २१-१५, २१-१६ ने पराभव केला. दरम्यान, चार लाख डॉलर बक्षिस असलेल्या या स्पर्धेत सिंधू दुसऱया फेरीत पोहोचली असून तिचा पुढील सामना थायलंडची बुसानन हिच्याशी होणार आहे.