मुंबई- कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याने दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनेही राज्य सरकारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे.
कोरोनाने चीनच्या वुहान शहरातून जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाची लागण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण याने दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याने आंध्र आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५० लाख तर केंद्र सरकारला १ कोटींची मदत दिली आहे.
पी. व्ही. सिंधूने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य सरकारांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत केली आहे. तिने याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. ही रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत जमा केली जाणार आहे.
दरम्यान, याआधी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने त्याचा सहा महिन्यांचा पगार हरियाणाच्या मुख्यमंत्री निधीत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच भारताचा क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीरने ५० लाखांची मदत केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी लॉकडाऊनमधील वंचितांना ५० लाख रुपयांचे तांदूळ वाटणार असल्याचे जाहीर केलं आहे.
हेही वाचा -श्रेयस म्हणतो.. विराट 'कठोर' तर रोहित प्रेरणादायक, जेमिमा मला आवडते
हेही वाचा -पोलिसांनी धोनीच्या फोटोद्वारे सांगितलं घरात राहण्याचे फायदे, म्हणाले, 'त्या' दिवशी आत असता तर...