हैदराबाद - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू कौंटुबिक कारणांमुळे लंडनला निघून गेल्याच्या वृत्ताचे तिचे वडील पी व्ही रमण यांनी खंडन केले आहे. 'गाट्रोड स्पोर्टस् सायन्स इन्सिट्यूट'(जीएसएसआय)मध्ये सिंधू गेली असून त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी एका माध्यमाने बातमी दिली होती की, सिंधू कौंटुबिक वादातून ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबीर अर्ध्यात सोडून लंडनला निघून गेली. त्यानंतर 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी सिंधूचे वडील पी.व्ही. रमण यांच्याशी संवाद साधला. त्यांनी माध्यमांचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, सिंधु तिच्या शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करू इच्छिते. त्यामुळे ती लंडनला गेली आहे. जबाबदार माध्यमांनी खोट्या अफवा पसरवणे चुकीचे असल्याचे रमण यांनी सांगितले.