हैदराबाद- जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची विजेती तथा भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज 'ईटीव्ही भारत'शी दिलखुलास गप्पा मारल्या. तिने टोकियो ऑलिम्पिंकसह हैदराबाद हंटरसोबतचा प्रवास यावेळी सांगितला.
आगामी टोकियो ऑलिम्पिकविषयी सिंधूने सांगितले की, 'ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी सामने सुरू आहेत. यामुळे प्रत्येक स्पर्धा महत्वाची आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे सोप्प नाही, पण यासाठी सर्व खेळाडू स्वतःला झोकून देत आहेत.'
लोकांना तुझ्याकडून खूप आपेक्षा आहेत याविषयी तु काय सांगशील असे विचारल्यानंतर सिंधू म्हणाली, 'लोक जेव्हा मला सपोर्ट करतात. हे पाहून मला खरचं चांगलं वाटतं. हार-जीत तर खेळाचा भाग आहे. पण प्रेशरच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, लोकांच्या आपेक्षा माझ्यासाठी प्रेशर नसून जबाबदारी वाटते. मी जेव्हा कोर्टवर जाते. तेव्हा सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा उद्देश असतो.'