महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

एक्सेल्सेनने जिंकले ऑल इंग्लंड ओपनचे विजेतेपद - All England Open men's singles title 2020 news

या दोघांमधील हा बारावा सामना होता. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या एक्सेल्सेनने १० वेळा तर, चौने दोन वेळा विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद जपानच्या युकी फुकुशियामा आणि सायाका हिरोता यांनी जिंकले.

Denmark's Viktor Axelsen won the All England Open men's singles title
एक्सेल्सेनने जिंकले ऑल इंग्लंड ओपनचे विजेतेपद

By

Published : Mar 16, 2020, 8:14 AM IST

बर्मिंगहॅम -डेन्मार्कच्या विक्टर एक्सेल्सेनने चिनी तैपेईच्या चेन चेन चौला मात देत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे जेतेपद जिंकले. स्पर्धेच्या दुसऱ्या मानांकित एक्सेल्सेनने ४६ मिनिटांमध्ये पहिल्या मानांकित चौचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला.

हेही वाचा -बीसीसीआयने केलेल्या हकालपट्टीनंतर मांजरेकरांनी तोडले मौन, म्हणाले...

या दोघांमधील हा बारावा सामना होता. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या एक्सेल्सेनने १० वेळा तर, चौने दोन वेळा विजय मिळवला आहे. या स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद जपानच्या युकी फुकुशियामा आणि सायाका हिरोता यांनी जिंकले. सायाका आणि युकीने चीनच्या की यूई दू आणि यिन हुई लीचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details