महाराष्ट्र

maharashtra

चीन ओपन : सिंधू, प्रणीतची विजयी घोडदौड सुरू, सायना स्पर्धेबाहेर

By

Published : Sep 18, 2019, 6:40 PM IST

सिंधूने अवघ्या ३४ मिनिटांत ली शुरुईचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला. तर दुसरीकडे, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक जिंकणारी सायनाला जागतिक क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबामरूंगपनने ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात १०-२१, १७-२१ ने पराभूत केले. दुखापतीतून सावरलेली २९ वर्षीय सायनाला पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.

चीन ओपन : सिंधू, प्रणीतची विजयी घोडदौड सुरू,

चीन - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. तिने बुधवारी चीन ओपन स्पर्धेत पूर्व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली शुरुईचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पण, या स्पर्धेत भारताची सायना नेहवाल हिला पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाबरोबर सायनाचे चीन ओपन सुपर १००० स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

हेही वाचा -'सुवर्ण'सिंधूचा वर्कआऊट पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'मी व्हिडिओ पाहूनच थकलो'

सिंधूने अवघ्या ३४ मिनिटात ली शुरुईचा २१-१८, २१-१२ असा पराभव केला. तर दुसरीकडे, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक जिंकणारी सायनाला जागतिक क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या बुसानन ओंगबामरूंगपनने ४४ मिनिटे रंगलेल्या सामन्यात १०-२१, १७-२१ ने पराभूत केले. दुखापतीतून सावरलेली २९ वर्षीय सायनाला पुन्हा फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.

हेही वाचा -उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

पुरुष एकेरीत भारताचा बी साई प्रणीतने थायलंडच्या सुपान्यू अविहिंगसननचा पराभव केला. प्रणीतने थायलंडच्या खेळाडूला २१-१९, २१-२३, २१-१४ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.

ABOUT THE AUTHOR

...view details